प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपा पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, शहराध्यक्ष धीरज घाटे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या हस्ते तुळजापूरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ‘तुळजापूरकर कुटुंब भारतीय जनता पार्टीला समर्पित कुटुंब आहे प्रेरणाच्या रूपाने आम्हाला एक सक्षम महिला मिळाली आहे. पक्षाची विचार धारा नक्कीच समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम सौ तुळजापूरकर करतील हा विश्वास आहे.’

प्रेरणा तुळजापूरकर म्हणाल्या, ‘पक्षाने दिलेली जबाबदारी नक्कीच मोठी आहे. वरिष्ठांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडून समाजाला आणि पक्षाला अभिप्रेत असे काम करणार आहे’.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार