अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी – छगन भुजबळ

येवला : शहरातील रस्ते, गटार, वीज यासह स्वच्छतेची कामे मार्गी लावण्यात यावी. तसेच अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

येवला संपर्क कार्यालय येथे आज येवला शहरातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व विकास कामाची आढावा बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, गटनेते प्रवीण बनकर,शहराध्यक्ष दिपक लोणारी, नगरसेवक निसार शेख, मुश्ताक शेख, मलिक शेख, सलीम मुकादम, अमजद शेख,तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नेहते, गटविकास अधिकारी शेख यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहरात सुरू असलेली विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच जी कामे मंजूर आहे ती तातडीने सुरू करण्यात यावी.आगामी निवडणुकांच्या पूर्वी शहरात राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. येवला शहरात अद्यापही लसीकरणाचा वेग कमी आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही – थोरात

Next Post

केंद्र व भाजपने देशाची माफी मागावी!: अशोक चव्हाण

Related Posts
पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांचा दिवाळी आनंद द्विगुणित

पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांचा दिवाळी आनंद द्विगुणित

Diwali 2023: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, Minister of State…
Read More
Mutual funds

म्युच्युअल फंड म्हणजे काय? यात गुंतवणूक केल्याने खरंच फायदा होतो का?

म्युच्युअल फंड (Mutual funds) हा एक प्रकारचा गुंतवणुकीचा (Investment) असा प्रकार आहे जो अनेक गुंतवणूकदारांकडून विविध प्रकारच्या सिक्युरिटीज…
Read More

मुंबईत हवा प्रदूषणात कमालीची वाढ झाली याला आदित्य ठाकरे जबाबदार – आशिष शेलार 

Mumbai Air Pollution: मुंबईत हवा प्रदुषणास कारणीभूत ठरलेल्या 6 हजार बांधकाम साईटवर सीसीटीव्ही लावून महापालिकेने लक्ष ठेवावे तसेच…
Read More