Sharad Pawar | पुरुषोत्तम खेडेकर बरळले; शरद पवारांची केली थेट शिवाजी महाराजांच्या सोबत तुलना

Sharad Pawar | छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अडचण आली होती. जेव्हा जेव्हा देशासमोर अडचण आली तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी साहेब झालेत, आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ असं धक्कादायक आणि संताजनक वक्तव्य

पुण्यात ‘अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब’ या कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर ( Purushottam Khedekar) बोलत होते.यावेळी त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून शिवप्रेमी आपली नाराजी दर्शवत आहेत.

खेडेकर नेमकं काय म्हणाले ?
संपूर्ण देशाला आवश्यक असलेला असा हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे. जागतिक तरुणाईचं आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. तुमची अस्वस्थता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा अडचण आली होती. या देशाचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. आजचे शिवाजी साहेब झालेत. आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही एवढे आपल्या कृतीतून आपण दाखवून द्यावे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार