पुणे : ‘जायका’ला अखेर केंद्राचा हिरवा कंदील ; मुळा व मुठाच्या संवर्धनाला वेग येणार

पुणे – जायका कंपनीच्या सहकार्यानं पुण्यात राबवण्यात येणाऱ्या बहुचर्चित मुळा मुठा नदी सुधार योजनेच्या निविदा प्रक्रियेला जायका कंपनीनं तसंच केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यामुळे आता नदी सुधार योजनेच्या निविदा, मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे येतील आणि त्यानंतर लवकरच कामांना प्रारंभ होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल दिली.

केंद्र सरकारनं राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, जपानी इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी आणि पुणे महानगरपालिकेबरोबर करार केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना महापौर म्हणाले,केंद्र सरकारच्या माध्यमातून आज जायका संस्थेनं आज टेंडर प्रक्रियेला मान्यता दिली. त्याच्या अगोदर जी काही टेंडर प्रक्रिया सगळी झालीये त्याला आता अधिकृतरित्या मान्यता मिळाली आणि लवकरच शहरातील जवळपास मोठ्या व्यासाच्या साधारण 60/65 किलोमीटर च्या डाय यात टाकल्या जातील.

सोबतच 11 मोठे एस टी पी याच्यामध्ये आता उभारले जातील आणि नद्यांमध्ये जे प्रदूषित पाणी जातं ते आता पुढच्या काळात थांबणारे त्यामुळे नदी सुधार असेल, नदी पुनर्जीवन असेल असे प्रकल्प आता एका वेळेला सुरू होण्यास मदत होणारे आणि खऱ्या अर्थानं पुणेकरांचं एक स्वप्न जे आमच्या नद्या स्वच्छ, सुंदर; नदीकाठ अत्यंत सुंदर असावा अश्या पद्धतीचं जे एक स्वप्न होतं ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होईल. लवकरच स्थायी समितीमध्ये तत्काळ त्याला मान्यता देऊन लवकरात लवकर हे काम आता सुरू होईल.