आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते – प्राजक्ता माळी 

मुंबई – मशिदीवरील भोंगे (Loudspeker) उतरवण्यासाठी मनसे आग्रही आहे. राज ठाकरे यांनी दिलेली मुदत आज संपणार आहे. मनसेची पुढील भूमिका ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची आज बैठक ( MNS Leader Meeting In Mumbai ) बोलावली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता. उद्यापासून मुदत संपणार आहे. मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास कोणाचेही एकूण घेणार नाही. मशिदींसोमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanumaan Chalisa) पठण करू, असा इशारा दिला आहे. राज्यातील राजकारण यामुळे तापले आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Actress Prajakta Mali) नुकतीच सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून प्राजक्ताने सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या (Akshayya Tritiya) आणि ईदच्या  (Eid) शुभेच्छा देत १ मे रोजी राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे( post is shared from Instagram account). यासोबतच तिने वर्तमानपत्रात असलेल्या एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. या लेखात मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत.

ही पोस्ट शेअर करत प्राजक्ता म्हणाली, “सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.)”  पुढे प्राजक्ता म्हणाली, “असो…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक. धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) सगळ्याचसाठी…परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद”, असे कॅप्शन तिने दिले आहे.