पन्नास वर्षाचा टोणगा असणाऱ्या राहुल गांधीचं लग्नच होईना ही कुणाची पनौती?  

Rahul Gandhi-  देशाच्या राजकारणात राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख खा.राहुल गांधी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे शिवसेनेकडून मुख्य प्रवक्ता पदी असलेले खा.संजय राऊत (Sanjay Raut) या दोन व्यक्तीविषयी राजकिय चांगल्या संस्कृतीची अपेक्षा वास्तविक पहाता सर्वसामान्य लोकांना सुद्धा राहिलेली नाही. उडाणटप्पुचं राजकारण करत विरोधकांच्यावर केवळ प्रसिद्धीसाठी बालिश आरोप करत राळ उठवुन देणं यापेक्षा दुसरं काहीच ही माणसं करत नाहीत. विश्वचषक सामन्यात भारताचा पराभव झाला त्याला कारणीभुत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) असं जर ही मंडळी म्हणत असेल तर बालिश बहु बायकात बडबडला यापेक्षा दुसरं काहीच लावता येत नाही. चार वर्षाचे मुलं शाळेत गेल्यानंतर सुरूवातीला जशी बडबड करतात तेवढंच काही?अंतिम सामन्यात पंतप्रधान पनौती वाटत असेल तर मग ज्या राहुल गांधीचं वय पन्नाशी झालं त्यांचं लग्नच होईना त्यामागचे कुणाची पनौती? हा सवाल आता जनतेलाच पडलेला दिसतो. पन्नास-साठ वर्षे ज्या पक्षाने देशावर राज्य केलं त्या कॉंग्रेस पक्षाची सद्यस्थितीत झालेली वाताहत याला केवळ राहुल गांधी कारणीभुत आहेत म्हणूनच पृथ्वीराज चव्हाण, गुलाब नबी आझाद यांच्यासारख्या 23 जेष्ठ मातब्बर पुढाऱ्यांनी नेतृत्वाविरूद्ध शड्डू ठोकला होता.

राहुल गांधींच्या उडाणटप्पूच्या राजकारणाचा अनुभव त्यांच्या पक्षातील जेष्ठ सहकाऱ्यांना आहे तसा देशातील नागरिकांनासुद्धा अधुनमधुन आलेला असतो. मुळात बालिश राजकारण करण्यात प्रसिद्धी नेहमीच राहिली. काय बोलावं? कुणावर बोलावं? कसं बोलावं? संविधान पदावर बसलेल्या व्यक्तीची प्रतिष्ठा या साऱ्या गोष्टी त्यांच्या नेतृत्वात कधीच दिसल्या नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात अधुनमधुन गरळ ओकताना हिंदुद्वेष्ट कडवी भूमिका नेहमीच लोकांनी पाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उदय होत असताना कॉंग्रेसमुक्त देशाचा विडा त्यांनी उचलला आणि गल्ली ते दिल्ली पक्षाला संपवुन टाकले. राहुल गांधी वंशपरंपरा घराणेशाही नेतृत्व ज्यांनी पक्षाचं अध्यक्षपद भुषवताना देखील वैचारिक संघटनात्मक काम करण्यात त्यांना अपयश आलं. संसदेत पंतप्रधानाच्या गळाभेटी घेतल्या तर कधी चुंबनाचे ऍक्शन वादात पडली. अनेकदा बसल्या खुर्चीवर मारलेला डोळा इथपासुन काल तर त्यांनी कहरच केला.

क्रिकेट खेळाचा आजवरचा इतिहास जर पाहिला तर प्रतिष्ठेच्या सामन्यामध्ये देशाचे राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील यांची उपस्थिती वेळप्रसंगी राहिलेली आहे. विश्र्वचषक बाहेर जरी राहिला तरी आपल्या देशाचे प्रमुख तिथे गेल्याचा इतिहास नाकारू शकत नाहीत. पंतप्रधान मोदीजींनी देशाची सुत्रे हाती घेतल्यानंतर खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन बरंच काही सांगुन जाते. ऑलिंपिकमध्ये कधी नव्हे ते मागच्या सात-आठ वर्षात खेळाडूंची कामगिरी सरस राहिली. यंदाचा विश्र्वचषक आपल्या देशात झाला.त्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी खऱ्या अर्थाने इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेण्यासारखी राहिली. तब्बल दहा सामने सलग जिंकले. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. त्यासाठी स्वत: पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांची उपस्थिती होती. गंमत बघा, ज्या राज्यातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करतात त्यांच्याच राज्यात नव्हे तर गावात जागतिक ऐतिहासिक अंतिम सामना जेव्हा भरवला जातो तिथे पंतप्रधानांची उपस्थिती हा खरं तर खेळाडूंचा सन्मान आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासारखं म्हणावे लागेल. वास्तविक पहाता देशातील एकुण क्रिकेट रसिकांपैकी 92 टक्के लोकांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीचं स्वागत केलं. शेवटी खेळ कोणताही असो? कुणीतरी जिंकणार कुणी हारणार. कारण खेळामध्ये विजय कुणाच्या कपाळी लिहिलेला नसतो. दहा सलग सामने जिंकल्यामुळे प्रत्येक भारतीयांश्चा आत्मविश्र्वास वाढणे साहजिकच.

पण एक लक्षात घ्या क्रिकेट, राजकारण आणि पाऊस याचं भविष्य कुणीच सांगु शकत नाही. बीसीसीआयच्या क्रमवारीत पहिला आलेला शुभम गील अवघ्या चार धावा काढेल याची कल्पना कुणीच करू शकलं नसेल. पण ज्या लोकांना विशेषत: राहुल गांधी, संजय राऊतांना भविष्य कळतं त्यांच्या कपाळी विजय लिहुनच ते जन्मले की काय? असा सवाल आता लोकांना पडला. पंतप्रधान पनौती असा उल्लेख करणं हा खरं तर अतिशय बालिशपणाच म्हणावा लागेल. दुसऱ्या बाजुने पन्नास वर्षाचा हा टोणगा झाला त्यांचं संसारिक जीवन तर सोडा पण साधं लग्न होईना? त्याला कुणाची पनौती हे स्वत: राहुल गांधीनं देशवासियांनाच सांगायला पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठी वायफळ बडबड करायची. राजकिय संस्कृती त्यातली वैचारिकता जणूकाही लंगोटीत गुंडाळून ठेवली. अशी भुमिका देशात राहुल आणि राज्यात संजय राऊत ज्यावेळी या मंडळीनं भारत केवळ पंतप्रधानाच्या उपस्थितीमुळे हारला असं माध्यमांना सांगुन पराभवाचा गुलाल स्वत:च्या हाताने अंगावर टाकून घेतला. त्यावेळी खेळाडूंच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं यांनी केलं. ज्यांना मैदानावर आपल्या खेळाडूंचे आश्रु दिसले नाहीत. अगदी पंतप्रधानाच्या गळ्यात काही खेळाडू ओक्साबोक्सी पडून रडले. ही सामाजिक संवेदना किमान या बडबड करणाऱ्या नेत्यांनी ओळखायला पाहिजे होती. हे खरं आहे की, गांधी- राऊतांना संवेदना असत्या तर अशा प्रकारचे गचाळ राजकारण त्यांनी कधीच केलं नसतं.

आपल्या स्वार्थासाठी राजकिय बडबडीचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या मनावर कसा होतो? एवढे ओळखुन तरी नेतृत्वाने राजकारण करायला हवं. संजय राऊत यांच्या बाबतीत तर बोलणं नको. अति ज्ञानी स्वत:ची समज असल्याने आपणच राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीत गेलं की देशाचे पंतप्रधान एवढा आविर्भाव त्यांच्या बोलण्यात आणि भाषेत आढळुन येतो. केवळ विरोधासाठी विरोध एवढंच राजकारण त्यांच्याकडून गेल्या पाच-सहा वर्षात लोक पहातात. यांच्या तोंडून कधी विधायक चचर्ा? कधी राष्ट्रभक्तीची चर्चा?, कधी विकासाची चर्चा?, कधी सामाजिक प्रश्नाची चर्चा?, असं कधीच पहायला मिळत नाही. केवळ आरोप आणि आरोप, शिवाय रोज मेकअप करताना ज्याप्रमाणे आपल्याला आरसा लागतो त्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता राऊतांना माध्यमांसमोर हजर व्हायचं, वेगवेगळ्या ऍक्शन करत बोंबलायचं, ज्याला कशाचा आधार नसतो?, मागेपुढे काही बघायचं नाही? केवळ राजकिय सुडापोटी आरोप करायचा. उदा.एखाद्या पक्षाचं अध्यक्ष आपल्या कुटुंबियासोबत बाहेर असतील तर त्यांच्यातलं काही काढून बातमी करणं आणि ती माध्यमाला पुरवणं यापेक्षा कपटनीतीचं राजकारण कधीच कुणी पाहिलं नाही. म्हणजे चौदा वर्षे प्रभु रामचंद्राच्या सोबत जंगलात पायपीट करून सावलीसारखं पाठीमागे चालणाऱ्या सीतामाई जेव्हा आयोध्येत येतात अशा पतीव्रता देवीवर देखील गावातील एक परीट शंका घेतो. तसंच काही संजय राऊत्ाांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील सहलीवर आक्षेप घेवुन बालिशपणा केला. तो राहुल गांधी यांच्या पनौती शब्दांच्याच बरोबरीनेच म्हणावा लागेल. त्यामुळेच या दोघांनाही देशातील आणि राज्यातील जनता करमणुकीचं साधन म्हणून त्यांच्याकडे बघते. नव्हे तर बालिश बहुबायकात बडबडले त्यामुळे आता त्यांच्याकडून सुसंस्कृत राजकिय वर्तणुकीची अपेक्षाच कुणाला राहिली नाही. हे  त्रिवार सत्य आहे.

ज्या पक्ष नेतृत्वाच्या विरोधात 23 सहकारी  शड्डू ठोकतात त्या राहुल गांधींनी खरं तर राजकारण सोडूनच द्यायला हवे. नऊ वर्षापासून नरेंद्र मोदी यांच्या नावाने बोंबा मारणाऱ्या राहुल गांधींना 2024 लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी नेतृत्वाची हॅटट्रिक होईल तेव्हा हे बाळ देशात राहिल का? येणारा काळ ठरवेल. पण या दोघांची पराकोटीची अनाठायी बाष्कळ बडबड पाहिल्यानंतर यांचं राजकारण स्वत:च्या पोटासाठी आहे की जनतेच्या भल्यासाठी? त्यामुळे एक लावणी मात्र आठवली. जिचा अर्थ जोडीला लागु होतो.
।। लाज धरा पाहुणं जरा ।। जनाची मनाची ।।
।। पोटासाठी नाचते मी ।। पर्वा कुणाची ।।

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे