जरांगे पाटलांना ‘हे’ शोभत नाही; उद्धव ठाकरेंच्या रणरागिणीने खडसावले 

Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषदेतून त्यांच्यावर कडाडून टीका करणारे छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. यातच आता सुषमा अंधारे यांनी जरांगेवर हल्लाबोल केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील पूर्ण प्रयत्नाने लढत आहेत, असं सुरूवातीला वाटलं होतं. पण मागील काही दिवसांपासून त्यांची वक्तव्ये पाहिली तर त्यांचा आरक्षणावरून फोकस हललेला दिसून येतो आहे. अगदी छगन भुजबळ यांची लायकी काय? इथपर्यंतचा त्यांचा तोल घसरला आहे. जरांगे पाटलांना व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणं शोभत नाही, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे यांना खडसावलं आहे.

त्याचवेळी आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे १०० जेसीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केलीये.

एकीकडे तुम्ही म्हणता आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. मग दुसरीकडे त्याची काय लायकी माझ्या हाताखाली काम करण्याची असंही म्हणता, ही विधानं चुकीची आहेत, असं स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी मांडला.

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे