“मला धर्मांध हिंदू नको, धर्माभिमानी हिंदू हवा”, राज ठाकरे यांचे लक्षवेधी वक्तव्य

Mumbai- गुढीपाडवा (Gudhipadwa) अर्थातच हिंदू नववर्षाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा (Padwa Melava Live) आयोजण्यात आला. या मेळाव्यात नेहमीप्रमाणे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या शब्दांनी टीकाकारांना गपगार केले. तसेच यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर खुलासे केले. यावेळी मुस्लिमांबद्दल राज ठाकरेंनी लक्षवेधी वक्तव्य केले.

मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे पण तो मुसलमान जावेद अख्तर ह्यांच्या सारखा मुसलमान हवा. असा मुसलमान पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावून येईल, असे आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले.