राज ठाकरे यांना अटक होणार? सांगली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

सांगली : हिंदुत्वाचा आवाज बुलंद करत भोंग्यांच्या (Loudspeker) विरोधात आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे एका जुन्या प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे तारखेला हजर राहिले नसल्यामुळे त्यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाने वॉरंट (Warrant by Shirala court) काढलं आहे.

2008 साली रेल्वे भरतीत (Railway recruitment) स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण न्यायालयाच्या (Kalyan Court) आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी (Shedgevadi) गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदाराना भाग पाडले. बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज यांच्याविरोधात भारतीय दंड विधान 109,117,143 आणि मुंबई पोलीस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्याविरोधात आरोपपत्र दाखल।करण्यात आले आहे. सुनावणीच्या तारखांना (Hearing Dates) कोर्टात हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) बजावले आहे.

दरम्यान, हे वॉरंट ६ एप्रिल रोजी जारी करूनही आतापर्यंत राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कोर्टाने पोलिसांना विचारल्याची माहिती समोर येत आहे.