Ram Charan | राम चरणने वाढदिवसाच्या दिवशी मुलगी आणि पत्नीसह घेतले तिरुपतीचे दर्शन

साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आज 39वा वाढदिवस साजरा करत आहे. देवाचे दर्शन घेऊन अभिनेत्याने दिवसाची सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी रामचरणने मुलगी किल्न कारा आणि पत्नी उपासनासह बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिरुपतीला पोहोचले. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यादरम्यान उपासना आपल्या मुलीला मीडियापासून लपवताना दिसली.

कुटुंबासह दर्शन घेतले
अभिनेत्याने पत्नी उपासना कामिनेनी आणि मुलगी किल्न कारा यांच्यासह तिरुपतीमध्ये बालाजीला भेट दिली. यावेळी अभिनेता पांढऱ्या रंगाच्या धोती कुर्त्यामध्ये दिसला. तर, उपासना पिंक कलरच्या साडीत दिसली. यावेळी उपासनाने किल्नला उचलून घेतले होते. मीडियाला पाहून तिने आपल्या मुलीचा चेहरा आपल्या साडीने लपवला.

‘गेम चेंजर’मध्ये दिसणार
राम चरणच्या (Ram Charan) आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘गेम चेंजर’. चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट मानला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात राम चरण आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

https://twitter.com/ANI/status/177279120

या चित्रपटात रामसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे. याशिवाय तो ‘इंडियन 2’, RC 16 आणि RC 17 मध्येही दिसणार आहे. यासाठी अभिनेत्याने दिग्दर्शक सुकुमार यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार