Vanchit Bahujan Aghadi | सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? प्रकाश आंबेडकर उमेदवार देणार; समीकरणे बदलणार

Vanchit Bahujan Aghadi | महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्र्यपणे त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितने ७ जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. सांगली लोकसभेसाठी प्रकाश शेंडगे यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) राज्य कमिटीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली लोकसभा जागेवर काँग्रेससह ठाकरे गटानेही दावा केला आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरे गटाने सोडल्याने ठाकरे गटाने सांगली लोकसभेवर दावा सांगितला आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणाही केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार