Sanjay Nirupam | खिचडी चोर अमोल किर्तीकर यांचा प्रचार करणार नाही, काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी शड्डू ठोकला

Sanjay Nirupam | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची यादी जाहीर झाली आहे. राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी ४ जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत. त्यांपैकी मुंबई वायव्य येथून अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

माझ्या वरीष्ठ नेत्यांना आग्रह करतो की, शिवसेनेला यासंदर्भात जाब विचाराला हवा. आमच्या नेतृत्वाला काही चिंता वाटत नाही आहे. मला मागील 10 दिवसात कोणीही संपर्क केला नाही आणि विचारलं नाही. आपण काय करु शकतो. काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच न्याय होत नाही. न्यायाच्या गप्पा मारणारे आपल्याच कार्यकर्त्यांवर अन्याय करतायत. माझा हक्क बनतो इथून लढण्याचा आणि आमचे नेतृत्व शिवसेनेला सरेंडर झालं. शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी खिचडी सप्लायरकडून दलाली घेतली आहे. अशा उमेदवाराला आमच्यावर थोपवलं आहे. मी खिचडी चोरचं काम करणार नाही, यासंदर्भात मी आत्ताच घोषणा करतोय, असे निरुपम म्हणाले.

मी माझ्या नेतृत्वाला सांगू इच्छितो, माझ्याकडील सर्व पर्याय खुले असतील. एका आठवड्याहून अधिक वेळ मी नाही देऊ शकत.असा इशाराही संजय निरुपम यांनी दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार