Ramdas Athawale | आंबेडकरांनी दिलेल्या निळ्या झेंड्याचा सन्मान वाढविण्याचा आमचा निर्धार

Ramdas Athawale | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध ओबीसी हिंदू सर्व जाती धर्मियांना एकत्र करून व्यापक रिपब्लिकन पक्ष (Republican Party) स्थापन करून निळा झेंडा आपल्या हाती सोपवला आहे रिपब्लिकन पक्षाचा सामाजिक परिवर्तनाचा निळ्या झेंड्याचा वारसा आम्ही देशभर चालवत आहोत .गरीब बहुजन वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहोत. राजकारणात आम्ही अनेक राजकीय युतीचे प्रयोग केले मात्र हाती असलेला निळा झेंडा कधी खाली पडू दिला नाही. आमचा प्राण गेला तरी बेहत्तर परंतु निळा झेंडा कधी खाली पडू देणार नाही. आगामी निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षा निळ्या झेंड्याचा सन्मान वाढवण्यासाठी काम करण्याचा निर्धार करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

महाड चवदार तळे येतील सत्याग्रहाच्या 97 व्या वर्धापनदिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना. रामदास आठवले बोलत होते.ते म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष आम्ही देशभर चालवत आहोत .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला निळा झेंडा आम्ही देशभर पोहोचवला आहे. भाजप शिवसेनेबरोबर आम्ही युती केली मात्र निळा झेंडा आम्ही कधी खाली पडू दिला नाही.निळ्या झेंड्याचा सन्मान वाढवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत आणि काम करीत राहू .

माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे. गरीब कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गरिबांचे प्रतिनिधित्व करणारा माझा पक्ष आहे. त्यामुळे महायुतीने आमच्या गरीब पक्षाला मागे ठेवू नये. माझे कार्यकर्ते गरीब असले तरी मजबूत आहेत. पँथर सारखे चपळ आहेत .रिपब्लिकन पक्ष कधी मागे राहत नाही. रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आगेकूच करणे चांगले जमते. त्यामुळे महायुतीने गरीब समजून रिपब्लिकन पक्षाला मागे ठेवू नये असा इशारा ना. रामदास आठवले यांनी दिला.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यावर केलेली क्रांती ही सामाजिक युगप्रवर्तक क्रांती होते सामाजिक समतेचा संघर चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केला सामाजिक क्रांतीमुळेच आज समाजात समता नांदत आहे.काही ठिकाणी दलित अत्याचार घडत आहेत मात्र समाजात परिवर्तन झालेले आहे .सवर्ण समाजातील अनेक लोक दलितांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. सर्व जाती धर्मातील लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानत आहेत. शिवशक्ती भीमशक्ती केल्यानंतर शिवसैनिक ही जय भीम बोलू लागलेले आहेत.समाजात परिवर्तन हळूहळू होत आहे. जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारून समतेचा भावनेने दलितांना पाठिंबा देत आहेत त्यांचे आपण स्वागत केले पाहिजे. नेहमीच नकारात्मक विचार करता कामा नये.जे काही बदल झालेत ते आपण स्वीकारले पाहिजेत असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

भाजप शिवसेनेला आमचा पाठिंबा दिला तरी हाती निळा झेंडा घेऊनच मी भाजप शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याचा सन्मान वाढवण्याचा निर्धार करा असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले.यावेळी नामदार रामदास आठवले यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड; संगीता आठवले; नैनाताई वैराट: सुनील मोरे; सचिन बनसोडे; आधी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज