शिवसेना नेत्यांनी सभेच्या आधी पैसे वाटले ? विरोधकांनी फोटो ट्वीट करून केली टीका

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली. हिंदुत्व (Hindutva), काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit), बाबरी (Babri), महागाई (Inflation), पाणीप्रश्न (Water Question)आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंच्या सभेतनंतर विरोधकांकडून त्यांना उत्तर दिले जात आहे. यासोबतच काही फोटो देखील व्हायरल केले जात असून यात शिवसेना नेते सभेसाठी पैसे वाटप Allocation of money for Shiv Sena leader meeting) करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि भाजप आमदार नितेश राणे (MNS leader Ameya Khopkar and BJP MLA Nitesh Rane) यांनी एक फोटो शेअर केला असून यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. आम्ही या फोटोजची पुष्टी करत नाही. काहींच्या मतानुसार हा फोटो जुना असल्याचे सांगितले जात आहे.