ज्ञानदीप विद्यालयामध्ये रंगला माजी विद्यार्थिनींचा माहेरवाशीण मेळावा

रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विद्यालयातील 1991 च्या दहावीच्या बॅच पासून ते 2020 च्या बॅच पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी रक्षाबंधन, नागपंचमी श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थिनींचा माहेरवाशीन मेळाव्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनात घडलेले अनेक किस्से गप्पागोष्टी रंगला सोहळा. तसेच रंगलेले पारंपारिक खेळ, विनोद,शालेय जीवनातील गमती जमती यामुळे विद्यार्थ्यांनीनी 25- 30 वर्षाच्या नंतर अनुभवला एक अनोळखा सांस्कृतिक सोहळा. सोहळ्याचे आयोजन विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी केले होते याचे विशेष कौतुक परिसरात होत आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष भागवत चौधरी, अध्यक्ष धनाजी भालेकर, संपत भालेकर सुभाष चौधरी,सूर्यकांत भसे, व माजी विद्यार्थिनींनी यांच्या प्रतिनिधी यांच्या हस्ते झाले. पारंपारिक लेझमानाच्या खेळाने माहेर वाशिनीचे स्वागत करण्यात आले. आकर्षक रांगोळ्या व सजवलेले भव्य सभागृह सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी परिचय सत्र त मध्ये आपण सध्या काय करत आहोत. याचे अत्यंत मार्मिक पण खुमासदार मंडणीने रंगले .अनेकांनी विद्यार्थिनींनी आपल्या संसारातील अनुभव व्यक्त करत असताना शालेय शाळेने दिलेल्या संस्काराची आज जीवनात काय किंमत आहे, याची जाणीवही करून दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंगळागौर,लावणी, अभंग देशभक्तीपर ,गीते कोळी गीते, एकपात्री, पारंपारिक लोकसंगीत यावर आकर्षक असे नृत्य व गायन सादर केले. आपापल्या बॅचने ऑनलाईन केलेल्या प्रॅक्टिस नंतर सादर केलेला कार्यक्रमांना सर्वांनी मनापासून दाद दिली. ज्ञानदीप विद्यालयाचे प्राचार्य सुबोध गलांडे यांनी प्रास्ताविक केले तसेच या मेळावा आयोजित करण्यामागील भूमिका मांडली.श्री भसेसर यांनी स्वागत केले .तर मानसी पवार, रोहिणी वाळुंजकर यांनी सूत्र संचलन केले. मधुरा गुप्ते -प्रधान हिने आभार मानले. या वेळी माजी शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजनातील रेखा व-ह डी, महेंद्र गावडे ,स्मिता जाधव ,स्वाती शिंदे अर्चना अंकलकोटे यांनी विशेष मेहनत घेतली. तर विद्यालयाचे माजी विद्यार्थी विशाल मानकरी, शरद भालेकर, मिलिंद पाचपांडे, निलेश भालेकर ,शुभम साबळे अभिजीत देवकाते अजिंक्य भसे यांनी विशेष सहकार्य करून सर्व माजी विद्यार्थिनींची भोजनाची व सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली.