Rohit Sharma | ‘एक खेळाडू आहे ज्याचं नाव ऋषभ पंत..’, रोहितने एका वाक्यात इंग्लंडच्या खेळाडूला केलं गप्पगार

Rohit Sharma | इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने (Ben Duckett) यशस्वी जैस्वालविरुद्ध केलेले वक्तव्य त्याला चांगलेच महागात पडले आहे. खरेतर, तिसऱ्या कसोटीनंतर डकेटने यशस्वीचे कौतुक केले होते, पण त्याच्या आक्रमक फलंदाजीचे श्रेय त्याने इंग्लंडला दिले होते. डकेट म्हणाला होता की, इंग्लंडला आक्रमक क्रिकेट खेळताना पाहून इतर संघही त्याचा अवलंब करत आहेत. यशस्वी आमच्याकडूनच शिकला आहे. यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी डकेटच्या या विधानावर ताशेरे ओढले होते.

डकेटला रोहितचे चोख प्रत्युत्तर
आता पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही ( Rohit Sharma) डकेटला सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक सामने जिंकून जगभर खळबळ माजवणाऱ्या ऋषभ पंतची रोहितने डकेटला आठवण करून दिली आहे. बुधवारी झालेल्या मीडिया कॉन्फरन्समध्ये हिटमॅन रोहितने इंग्लंडच्या संघाला, विशेषत: बेन डकेटला खोचक टोला लगावला. कदाचित त्याने ऋषभ पंतला फलंदाजी करताना पाहिलं नसावं, म्हणून अशी टिप्पणी करण्यात त्याला अजिबात संकोच वाटला नाही, असे रोहितने म्हटले आहे.

‘डकेटने पंतबद्दल ऐकले नाही’
डकेटच्या विधानाबद्दल विचारले असता रोहित म्हणाला, ‘आमच्या संघात एक खेळाडू होता ज्याचे नाव ऋषभ पंत आहे. माझा अंदाज आहे की बेन डकेटने त्याला खेळताना पाहिलेले नाही.’ यशस्वी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून उदयास आला आहे. आतापर्यंत त्याने चार सामन्यांत 94.57 च्या सरासरीने आणि 78.63 च्या स्ट्राइक रेटने 655 धावा केल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान