WPL 2024 | मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने सर्वात वेगवान चेंडू टाकत महिला क्रिकेटमध्ये घडवली ‘क्रांती’, डब्ल्यूपीएल 2024 मध्ये रचला इतिहास

WPL 2024 | दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने (Shabneem Ismail) महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणली आहे. वुमेन्च्यास प्रीमियर लीगच्या (Women’s Premier League) सामन्यात तिने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. आता तुम्ही म्हणाल सर्वात वेगवान चेंडू टाकत क्रांती घडवून आणणे म्हणजे काय? तर या दोघांमध्ये एक संबंध आहे. शबनिम इस्माईलने टाकलेल्या सर्वात वेगवान चेंडूचा वेग 132.1 किमी प्रतितास नोंदवला गेला आहे.

डब्ल्यूपीएल 2024 (WPL 2024) मध्ये, 5 मार्चच्या संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, शबनीम इस्माईलने चेंडू टाकला जो केवळ महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातीलच नव्हे तर महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू मानला गेला. म्हणजे महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतका वेगवान चेंडू यापूर्वी कधीच टाकला गेला नव्हता.

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्येही, सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम शबनीम इस्माईलच्या नावावर आहे, जो तिने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 128 किमी प्रतितास वेगाने टाकला होता. पण, यावेळी तिने 130 किमी प्रतितास वेगाचा अडथळा पार करून क्रांती घडवून आणली आहे, कारण महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गोलंदाजाने 130 किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकला आहे.

आता प्रश्न असा आहे की शबनीम इस्माईलने सामन्यात सर्वात वेगवान चेंडू कधी टाकला? तर हा सामन्याच्या तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू होता. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार ऑस्ट्रेलियन फलंदाज मेग लॅनिंग फलंदाजी करत असताना शबनीमने हा विक्रमी चेंडू टाकला. लॅनिंगने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू थेट तिच्या पॅडवर लागला. शबनीमकडून एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील करण्यात आले पण पंचांनी ते अपील फेटाळले.

मात्र, महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या शबनिमची कामगिरी या सामन्यात काही खास नव्हती. तिने 4 षटकात 46 धावा दिल्या आणि त्याबदल्यात फक्त एक विकेट घेतली. एवढेच नाही तर तिचा संघ मुंबई इंडियन्स हा सामना हरला. दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा 29 धावांनी पराभव केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान