विजयाचे श्रेय माझे नाही.. मराठ्यांच्या ताकदीचे; मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आनंद

Manoj Jarange Patil, Maratha Reservation: महाराष्ट्रात आरक्षणासाठी मराठा आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महायुती सरकारने मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. मनोज जरांगे आज लाखो लोकांसह मुंबईत दाखल होणार होते. मात्र तत्पूर्वी मध्यरात्री मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांनी मराठा आरक्षणाबाबतचे राजपत्र मनोज जरंगे यांना सुपूर्द केले. मनोज जरांगे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचून उपोषणाची सांगता करणार आहेत.

सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विजयाचे श्रेय माझे नाही तर सर्व मराठ्यांचे आहे. मराठ्यांच्या ताकदीमुळे सरकारला अध्यादेश काढावा लागला. तुर्तास आंदोलन मागे घेत आहोत, असं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे.

मराठा मुंबईकडे निघाला तसे अध्यादेश निघत गेले. हा मराठा समाजाचा विजय आहे. यात गुन्हे माघे घेण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच सगेसोयरे यांच्याबाबातही अध्यादेश काढण्यात आला आहे. सात ते आठ अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. मुख्यमंत्री शिंदे येणार आहेत. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात येईल, असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठे मुंबईत निघाले होते. कोणीही घरी राहणार नव्हतं. हे पाहून सरकारने अध्यादेश काढला. मराठा समाज जल्लोष स्वागत करत आहे. एक मोठी विजयाची सभा घेण्यात येणार आहे. आंतरवाली सराटी येथे गेल्यानंतर त्याबाबत माहिती देण्यात येईल. खूप वर्षांनतर यश मिळालं आहे. ऐतिहासिक विजय आहे. त्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करत आहोत, असं जरांगे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके

कारागृह विभागातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर

अजित पवार यांनी आपल्या मुलाला समजावलं पाहिजे; खडसेंनी थेट अजितदादांना फटकारले