‘या’ दिग्गजांसाठी विश्वचषक ठरू शकतो शेवटचा, 10 हजार धावा करणारे 2 भारतीय यादीत

ICC ODI World Cup: आयसीसी विश्वचषक २०२३ भारतात आयोजित करण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित या स्पर्धेची ही 13 वी आवृत्ती आहे. यावेळी विश्वचषकात 10 संघ सहभागी होत आहेत. स्फोटक खेळाच्या जोरावर भारताने आशिया चषक 2023 वर (Asia Cup 2023) कब्जा केला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघ यावेळी विजयाचा दावेदार मानला जात आहे. घरच्या मैदानावर खेळणारी टीम इंडिया अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि टीममध्ये एकापेक्षा एक धोकादायक खेळाडू आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला मायदेशात आयसीसी विश्वचषक जिंकून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS DHoni) 2011 च्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराचा हा शेवटचा विश्वचषक मानला जात आहे. रोहित शर्माने 250 वनडे खेळल्यानंतर 10031 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठीही (Virat Kohli) हा विश्वचषक शेवटचा असू शकतो. 35 वर्षांचा असलेला कोहली 4 वर्षांनंतर होणाऱ्या या स्पर्धेत 39 वर्षांचा असेल. 13027 वनडे धावा करणाऱ्या कोहलीने 47 शतके झळकावली आहेत. वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांनी म्हटले आहे की विराट कोहलीचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो.

रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) कसोटी विक्रम जितका प्रभावी आहे तितकाच त्याच्या वनडेतील कामगिरीचा आहे. या दिग्गज खेळाडूचा हा शेवटचा विश्वचषक मानला जात आहे. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठीही पुढचा प्रवास खूप कठीण वाटत आहे. सध्या तो चांगलाच फॉर्ममध्ये आहे आणि स्फोटक शतकी खेळी खेळून पुनरागमनही करत आहे, मात्र त्याचा देखील हा शेवटचा विश्वचषक असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’