“आधी टिकली लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं विधान

Mumbai – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी टिकली लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे विधान केले आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे वादग्रस्त विधान केले. दरम्यान, काहींनी भिडे यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे तर काहींनी त्याचं समर्थन देखील केले आहे.