Maharashtra Politics | महाविकास आघाडीला खिंडार; लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपामध्ये इनकमिंग वाढली

Maharashtra Politics  : लातूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब देशमुख, नाशिक येथील स्वामी श्रीकंठानंद, पुसद नगरपालिकेचे माजी सभापती अजय पुरोहित आदींसह लातूर, यवतमाळ, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश (Maharashtra Politics ) केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला खा. सुधाकर श्रृंगारे, आ. अभिमन्यू पवार, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, पदवीधर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक धनराज विसपुते आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार्‍यांमध्ये उमरखेड नगरपालिकेचे माजी सभापती अ‍ॅड. शैलेश मुंगे, यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकणे, सोनार सेवा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, मनोहर खरवडे, अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र महाडोळे, अमोल गुर्नुले, सोलापूर येथील लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्ष रंजना चकोटे, अ.भा.वाल्मिकी नवयुवक संघाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष आणि उल्हासनगरचे माजी नगरसेवक मोहन कंडारे, संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे, पंकज शेलार, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे आदींचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील स्वामी श्रीकंठानंद हे रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष असून या संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्यात आरोग्य आणि अध्यात्मिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जातात.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!