शिलेदार ट्रस्ट संचलित स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या ‘सचिव’पदी केतन महामुनी यांची निवड..!

पुणे: गेली अनेक वर्षे गड-किल्ले, इतिहास वारसा संवर्धनाचे काम करणाऱ्या शिलेदार ट्रस्ट संचलित स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी केतन प्रमोद महामुनी (Ketan Mahamuni) यांची निवड करण्यात आली. शिलेदार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मंगेश नवघणे यांनी कार्याध्यक्ष सागर फाटक, पुणे सोशल मीडिया प्रमुख स्वप्नील कळंबटे, कोकण विभाग प्रमुख रोहित कळंबटे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.

महाराष्ट्रभर संघटनेच्या सामाजिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण तथा आरोग्य क्षेत्रात विस्ताराची प्रमुख जवाबदारी केतन महामुनी यांना देण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाचा, अनुभवाचा आणि जनसंपर्काचा आम्हाला निश्चितच फायदा होईल असे मत नवघणे यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यासोबतच, संघटनात्मक वाढीवर भर
गेली १६ वर्षे मी शिवसंग्रामच्या माध्यमातून कार्यरत आहे, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी संधी मला देण्यात आली त्यासाठी मी संघटनेचा आभारी आहे. पुढील काळात ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धनाच्या कार्यासोबतच सामाजिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण तथा आरोग्य क्षेत्रात संघटनेच्या विस्ताराची जवाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. निश्चितच पुढील काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एक मोठे संघटन आम्ही सर्वजण मिळून निर्माण करून हि मला खात्री आहे असे केतन महामुनी यांनी सांगितले.