Sunil Tatkare | आयुष्यभर एका धर्माचा द्वेष करत आले तेच आज निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचे लांगूलचालन करत आहेत

Sunil Tatkare | भाजपाने कधीही धर्मनिरपेक्ष विचार बाजूला करा असे आम्हाला महायुतीमध्ये घेताना म्हटलेले नाही परंतु जे आयुष्यभर एका धर्माचा द्वेष करत आले तेच आज निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचे लांगूलचालन करत आहेत मात्र यांच्यापासून सावध व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दापोली येथील अल्पसंख्याक मेळाव्यात केले.

आज सकाळी मंडणगड येथे प्रचाराच्या निमित्ताने अल्पसंख्याक मेळावा पार पडला. त्यानंतर दापोली येथे दुसरा अल्पसंख्याक मेळावा मोठया उत्साहात पार पडला. आखाती देशात जाणारा माझा मुस्लिम तरुण इथेच नोकरीधंदा करावा, त्यानेच इथेच रहावे यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून अनेक योजना व उद्योगधंदे आणण्याचे काम करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.

कुणबी समाजाचे नाव घेऊन अनेक निवडणूका अनंत गीते यांनी लढवल्या मात्र ४० वर्षांपासून कुणबी समाजोन्नती संघाचा रखडलेला भूखंड आणि इमारतीचे काम त्यांना करता आले नाही मात्र हे काम अजितदादा पवार यांनी तात्काळ पूर्ण केले हे आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

सर्वांचा विश्वास जिंकत या मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे तुमच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी द्यावी असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.यावेळी अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, दापोलीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे आदींनी आपले विचार मांडले.

यावेळी अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, कार्याध्यक्ष वसीम बुर्‍हाण,दापोली उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाणे, तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते