Ganesh Festival: शाहरुख खानच्या घरी गणरायाचे स्वागत, किंग खानने शेअर केला खास फोटो

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. जो प्रत्येक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षी तो आज म्हणजेच 19 सप्टेंबर 2023, मंगळवारी साजरा केला जाईल. हा 10 दिवसांचा गणोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आपापल्या घरी गणपतीचे स्वागत करतात आणि त्याची मूर्ती बसवतात.

अशातच किंग खानच्या (Shahrukh Khan) घरी म्हणजेच मन्नतमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे. शाहरुखने त्याच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या घरी गणपतीचे आगमण झाल्याचे दिसत आहे.


शाहरुखने सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खानने पोस्टमध्ये म्हटले की, ‘गणपती बाप्पाचं घरी स्वागत केलं. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्री गणेशाच्या पूजनाच्या शुभेच्छा. भगवान गणेश आपल्या सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक मिळो!!!”.

महत्त्वाच्या बातम्या-
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Utsav 2023: भगवान गणेशाच्या ‘या’ १२ अवतारांचे आहे खास महत्त्व, वाचा बाप्पांबद्दल खास गोष्टी

Ganesh Chaturthi 2023: अशा प्रकारे घरी बनवा गणपतीचा आवडता मोदक, सर्व इच्छा होतील पूर्ण!