‘बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री आणि दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवकही नाही’

मुंबई – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात धर्मवीर(Dharmveer)  या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने(prasad oak) आनंद दिघेंची(Aanand dighe) भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास दाखवण्यात आला  आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. एका बाजूला या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक भाजप नेते निलेश राणे यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

आपल्या पोस्टमधून राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,”शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही. असं राणे यांनी म्हटले आहे.