पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीसारखे काहीही नाही, तिथे किम जोंग उनचे सरकार – गिरीराज सिंह

Giriraj Singh : पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तृणमूल काँग्रेस ( टीएमसी ) वर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्यात उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासारख्याच सरकारचे नेतृत्व करताना दिसत आहे, जिथे लोकशाही स्पष्टपणे अनुपस्थित आहे असे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.

इडीचे अधिकारी, जे तपास करत होते, त्यांच्यावर बंगालमध्ये घुसखोरी करणाऱ्या टीएमसीच्या गुंड आणि रोहिंग्यांनी हल्ला केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नाकाखाली पश्चिम बंगालमध्ये जंगल राज सुरू आहे पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीसारखं काही नाही. तिथे किम जोंग-उनचं सरकार असल्याचं दिसतंय. खून झाला तरी ते नवीन नाही. ही ममता बॅनर्जींची लोकशाही आहे, असं गिरीराज म्हणाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उत्तर २४ परगणा जिल्ह्यात ईडी अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनीही ‘राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही’ असे सांगून ईडी टीमवर केलेल्या हल्ल्यानंतर टीएमसी या मित्रपक्षावर टीका केली.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स