Sharad Pawar | चिकाटीनं काम करणाऱ्या निलेश लंकेसारख्या कार्यकर्त्यांची गरज

पुणे (Sharad Pawar)  – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेरची जागा लढवायचा विचार आला त्यावेळेला पारनेरमध्ये आणखी आमचे काही सहकारी होते. पण मतदारसंघाची माहिती घेतल्यानंतर आम्ही निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी दिली. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील  आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की,पारनेरमध्ये आम्ही सर्वांना संघटीत करण्याचं काम केलं. पारनेरने मला आणि माझ्या विचारांना पाठिंबा देण्याचं काम केलं. अशा ठिकाणी सामान्यांचं काम करणारा, सामान्य परिस्थितीतले निलेश लंके यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. निलेश लंके यांनी अखंडपणे जनेची सेवा केली. त्यांची जनतेशी अतिशय प्रामाणिकपणे होते. त्यामुळे त्यांच्यासोबत आमची साथ कायमस्वरुपी आहे. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. ते पक्षाच्या कार्यालयात आले आहेत. आम्ही निलेश लंके यांच्याकडे अतिशय कष्ट करणारे म्हणून पाहतो. आमच्यात राजकारणाची चर्चा झाली नाही असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पारनेरची जागा लढण्याचा विचार जेव्हा आमच्या मनात आला तेव्हा आणखी काही आमचे सहकारी होते. पण थोडी माहिती घेतल्यानंतर असे दिसून आले की, निलेश लंके यांची निवड केली. पारनेर हा दुष्काळी तालुका. तिथे एमआयडीसी आणली. कारखानदारी वाढवली. तिथे दुधाचा धंदाही वाढला.असेही शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

शरद पवार यावर सविस्तर बोलताना  म्हणाले की, या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही लंकेकडे पाहतो. त्यांच्या विधानसभेच्या प्रचारालाही गेलो होतो. त्यांची बांधिलकी जनतेशी होती. लोकांच्यासाठी काम करतात त्यांनी मी प्रोत्साहन देतो. पक्षाच्या कार्यालयात ते आले त्यानिमित्तानं त्यांचे स्वागत करतो. सध्या दुष्काळाचे सावट आहे. तिथे चिकाटीनं काम करणाऱ्या लंकेसारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यांना  मदत लागल्यास आम्ही तयार आहोत असेही पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?