शरद पवारांनी 25 वर्षांनी घेतलं संत तुकाराम महाराजांचं दर्शन

देहू – काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत आले होते. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील देहूत जाऊन आले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या ( Saint Tukaram Maharaj ) जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत पार पडला. या सोहळ्याला शरद पवार यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे पवार यांनी काल 25 वर्षांनी जगतगुरु संत तुकोबांचे मुख्य मंदिरात येऊन दर्शन घेतलं. यावेळी देहू संस्थानकडून तुकोबांची मूर्ती, पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, देहूला गेल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नसतं. जगद्गुरूंची सेवा करणं खूप गरजेचं असतं असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले. गेल्या 400 वर्षांपासून समाजाला योग्य दिशा देण्याचं महान काम कोणी केलं असेल तर ते नाव म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं आहे. शब्दांच्या माध्यमातून ज्यांनी कार्य केलं ते म्हणजे संत तुकाराम महाराज आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यांच्यावर आधारित ही दिनदर्शिका होणं आणि ती घरोघरी पोहचणं हे महत्त्वाचं आहे असं शरद पवार म्हणाले.