Thackeray Govt | “तुळजापूर-सोलापूर-धाराशिव रेल्वेसाठी ठाकरे सरकारने राज्याच्या हिश्याचा निधीही दिला नाही, मग श्रेय कसे घेता?”

Thackeray Govt | तुळजापूर – सोलापूर धाराशिव रेल्वेसाठी केंद्राकडून निधी मिळून सुद्धा ठाकरे सरकारने राज्याच्या हिश्याचा निधी दिला नाही. युती सरकार अस्तित्वात आल्यावर या रेल्वेसाठीचा राज्याचा निधी मिळाला आणि टेंडर प्रक्रिया सुरू झाली. मग श्रेय घेण्यासाठी कसे विरोधक कसे पुढे येतात? असा सवाल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज केला. लोकसभा निवडणूक 2024 साठी धाराशीवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई भवानीच्या तुळजापूरचा उल्लेख करीत याला मोठे तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याला विकास करायचा आहे असे सांगितले होते. तसेच तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावर आपण निश्चितपणे आणू; एकदा का भाविक इथे येऊ लागले, की इथली अर्थव्यवस्था बदलेल आणि या अर्थकारणाच्या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांना प्रचंड चालना मिळेल 2019 मध्ये त्यांनी त्याचं भूमिपूजनही केलं. मात्र त्यानंतर ठाकरे सरकार आलं. त्यांना मी वेळोवेळी विनंती केली की, तुळजापूर – सोलापूर – धाराशिव रेल्वेसाठी 50% केंद्राचा निधी आणि 50% राज्याचा निधी द्यायच ठरलं आहे. केंद्रांनी त्यांच्या बजेटमध्ये तशी तरतूद देखील केलेली आहे मात्र मी वारंवार पाठपुरावा करून देखील ठाकरे सरकारने (Thackeray Govt) त्यासाठी एक रुपया देखील दिला नाही.

पुढे बोलताना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले,  त्यानंतर शिंदे सरकार आलं आणि यासंदर्भात तातडीने निर्णय झाला. या रेल्वेसाठीच टेंडर देखील निघाला असून अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी निधी देखील मंजूर केला आहे. टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून ते काम आता अंतिम टप्प्यात आहे.  ठाकरे सरकारने यापूर्वीच या कामाला निधी दिला असता तर आतापर्यंत रेल्वे आली असती, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात