पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर फेकली चप्पल

पिंपरी चिंचवड –राजकीयदृष्ट्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रोखणे अवघड होते असल्याने आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पातळी सोडू लागली आहे का असा सवाल आज नाविलाजाने उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे. अटल बिहारी वाजपेयी उद्यानात प्रवेश करताना ही धक्कादायक घटना घडली. फडणवीसांचा विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळीच फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली.

दरम्यान, ही व्यक्ती कोण होती आणि यामागे त्याचा काय उद्देश होता याचा शोध पोलीस घेत आहेत. ही चप्पल नेमकी कुणी भिरकावली हे समोर आलेले नसले तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनेच हे भ्याड कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.