रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा; करुणा मुंडे यांची मागणी 

Mumbai – रुपाली चाकणकर (Rupali Chakaankar) यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे( Karuna Munde)  यांनी केली आहे. मुंडे यांनी यांची लेखी पतत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे ही मागणी केली आहे. सोबतच केंद्रीय महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे.

रुपाली चाकणकर पक्षपातिपणाने काम करतात… या शिवाय अनेक गंभीर आरोप असलेल्या नेत्यांसॊत त्यांचे असलेले फोटो आज ही त्यांच्या फेसबुक वॉल वर दिसून येत आहेत… या शिवाय तक्रारदार महिला आयोगात तक्रार घेऊन आल्यावर तेथून फोटो… व्हिडीओ प्रसारित करतात या मुळे या महिलांची ओळख समाजापुढे येत आहे. या व इतर कारणासाठी रुपाली चकणाकर यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावरून मुक्तता करा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे..