20 वर्षात 40 जणांची हत्या; शेतकरी कुटुंबातील मुन्ना एवढा मोठा गुन्हेगार बनेल, असे कुणालाही वाटले नव्हते 

नवी दिल्ली- पूर्वांचलचा कुख्यात माफिया मुन्ना बजरंगी याने 20 वर्षांत 40 जणांची हत्या करून वर्षानुवर्षे गुन्हेगारीच्या जगात दहशत  निर्माण केली होती. जुलै 2018 मध्ये यूपीच्या बागपत तुरुंगात त्याच्या हत्येपूर्वी त्याची ओळख एक भयानक मारेकरी अशी झाली होती. वयाच्या 17 व्या वर्षी पहिला रक्तपात केल्यानंतर त्याला रक्तपाताचे इतके व्यसन जडले की तो अनेक टोळ्यांसोबत राहिला आणि नंतर स्वत:ची टोळी तयार करून परिसरात खून, खंडणी, अपहरण असे उद्योग सुरू केले. त्याच्यावर ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यादरम्यान तो 250 कोटींच्या मालमत्तेचा मालक बनला.सुरुवातीला माफिया मुन्ना बजरंगी हा स्थानिक बाहुबली गजराज सिंहच्या आश्रयाखाली होता. त्याच्या सांगण्यावरून त्याने अनेक खून केले. नंतर तो गुन्हेगारी राजकारणी मुख्तार अन्सारीच्या टोळीत सामील झाला आणि टोळीतील सर्वात भयानक शूटर म्हणून ओळखला जाऊ लागला. खंडणी व खुनाची कामे करण्यात मुन्ना अतिशय सफाईने करत असत.  (special article on munna bajrangi )

पाचवीपर्यंत शिकलेल्या मुन्ना बजरंगीला सुरुवातीपासूनच शस्त्रांची आवड होती. मुन्ना बजरंगीच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता, जेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. या प्रकरणात बजरंगीवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. मुन्ना बजरंगीचे खरे नाव प्रेम प्रकाश होते.
1988 मध्ये, हरिद्वारमध्ये यूपी एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत तो जखमी सुद्धा झाला होता. त्यानंतर तो अनेक वर्षे दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता पुढे तो मुंबईत स्थायिक झाला. यादरम्यान तो अनेकवेळा परदेशातही गेला आणि तिथूनही त्याने आपले कारनामे केले. त्याचे अंडरवर्ल्डशीही संबंध होते.

काही वर्षांनंतर 29 नोव्हेंबर 2005 रोजी माफिया डॉन मुख्तार अन्सारीच्या सांगण्यावरून त्याने गाझीपूरमधील भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या केली. खून करण्यापूर्वी त्याने पूर्ण तयारी केली होती. आमदार कृष्णानंद राय यांच्यावर 400 हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी आमदारासोबत असलेल्या सहा जणांनाही आपला जीव गमवावा लागला.

गाझीपूरचे आमदार कृष्णानंद राय (Ghazipur MLA Krishnanand Rai) यांची हत्या केल्यानंतर तो यूपी, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात मोठी शक्ती म्हणून उदयास आला . त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक सापळे रचले, पण तो सहजासहजी पकडला गेला नाही. पोलिसांनी त्याच्यावर सात लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दोन वर्षे पोलीस रात्रंदिवस त्याचा शोध घेत होते. मोठ्या कष्टाने त्याला २००९ मध्ये मुंबईतून अटक करण्यात आली. मुन्ना बजरंगी, जोपर्यंत मुख्तारसोबत होता, तोपर्यंत त्याने आपली बेकायदेशीर कामे धडाडीने केली. यूपीशिवाय मुंबई, बिहार-झारखंडमध्ये त्याच्याकडे 250 कोटींहून अधिक किमतीच्या अनेक बेनामी मालमत्ता आहेत. मुन्नाने रस्त्यापासून रेल्वेपर्यंतच्या कंत्राटांमध्ये आपला पाय रोवला होता, पण जेव्हा तो पकडला गेला आणि तुरुंगात गेला तेव्हा काही वर्षांनी त्याला तुरुंगातच गोळ्या घालून ठार करण्यात आले.