अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंबरोबर सहा तास चर्चा केली, आणि मग दिले ‘हे’ आश्वासन

नवी दिल्ली – लैंगिक शोषणाचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषणसिंग (Brijbhushan Singh) यांच्यावरील आरोपांची चौकशी 15 जून पर्यंत पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असं आश्वासन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर (Anurag Thakur) यांनी कुस्तीपटूंना दिलं आहे. कुस्तीपटूंबरोबर ठाकूर यांनी काल सुमारे सहा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना चर्चेबद्दल माहिती दिली.

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 30 जून रोजी होईल. तसंच महासंघाच्या अंतर्गत एक समिती स्थापन करण्यात येऊन तिच्या प्रमुखपदी एक महिला असेल. कुस्तीपटूंवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्यात येतील, असं आश्वासन ठाकूर यांनी दिलं असून 15 जूनपर्यंत निदर्शनं, आंदोलन न करण्याचं कुस्तीपटूंनी मान्य केलं आहे.