Sunny Leone | सनी लिओनीचा जबरा फॅन, हातावर काढला टॅट्यू, व्हिडिओ शेअर करत बेबी डॉल म्हणाली…

Sunny Leone Fan : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीला प्रेक्षक तिच्या अभिनयासाठी पसंत करतात. सनीचा मोठा चाहता वर्ग आहे. सनी तिच्या ग्लॅमरस लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करते. नुकताच सनीने तिच्या चाहत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने हातावर सनीच्या चेहऱ्याचा टॅटू काढलेला दिसत आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. चाहत्यांच्या प्रेमाची ही कहाणी काही वेगळीच आहे. सनी लिओनीच्या अशाच एका चाहत्याने हातावर सनीचा चेहरा टॅटू गोंदवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे
सनीने (Sunny Leone) तिच्या चाहत्याचा टॅटूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टॅटू आयुष्यभर टिकतात, या प्रेमासाठी धन्यवाद.’

सनीला बॉलिवूडची बेबी डॉल म्हटले जाते. सनीने जिस्म-2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ ही सनी लिओनीच्या जीवनावर आधारित वेब सीरिज होती.

सनी ‘स्प्लिट्सविला X5’ होस्ट करणार
सनी ‘ग्लॅम फेम’ शोला जज करताना आणि बहुप्रतिक्षित रिॲलिटी शो ‘स्प्लिट्सविला एक्स 5’ होस्ट करताना दिसणार आहे. याशिवाय ती अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ आणि ‘कोटेशन गँग’ या तमिळ चित्रपटांमध्येही दिसणार आहे. सनीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान