राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतल्याने जबाबदारी वाढली आहे; उडान तय करेगी आसमान किसका है – छगन भुजबळ

Chhagan bhujbal – कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला.

मुंबईमध्ये पक्ष ज्यापध्दतीने वाढायला हवा होता. तशाप्रकारचा पोचला नाही. आमचं लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल असेही अजित पवार म्हणाले.

आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा. ज्याला पद देत आहात किंवा देणार आहात त्यांची प्रतिमा त्याच्या विभागात चांगली आहे का याचाही विचार करा असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आठवडयातील एक दिवस आपल्या आमदारांना वेळ द्यायला सांगेन. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे आज दिसले. शिवसेना फक्त मुंबईत होती त्यानंतर ती कोकणात पोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु. मला सांग सकाळी मुंबईतील वेगवेगळ्या भागात येतो. लोकहिताच्या कामांची पाहणी करतो. या मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही अजित पवार यांनी दिला.

धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. काहीजण आज करतो उद्या करतो सांगत असतात अरे काय देवळातील घंटा आहे का ती असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहेत. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी असेही मत अजित पवार यांनी मांडले.

अल्पसंख्याक, ओबीसी, मागासवर्गीय या समाजांना निधीची कमतरता भासू दिली नाही. आपण वंचित व बहुजनांकरता काम करत आहोत हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.

चांद्यापासून बांद्यापर्यंत जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील असा प्रयत्न करायचा आहे. हे राज्य माझे आहे, सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला काम करताना देत आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

समीरभाऊंच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत उभी राहिल. एक एक पायरी म्हणजे कार्यकर्ता असतो. तो नेत्याला जोडणारा दुवा असतो. सर्व जाती धर्माच्या लोकांचा आपण आदर करतो. सर्व सणांमध्ये सहभागी होतो. हे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे आले पाहिजे. सत्तेकरता आम्ही सत्तेत गेलो नाही. सर्व सामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता निर्णय घेतला. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही अजित पवार यांनी विरोधकांना केला.

स्वतः ची प्रसिद्धी करण्यासाठी मी काम करत नाही किंवा सोशल मिडियावर पोस्ट करत नाही. पहाटे उठून लोकांची कामे कशी होतील असा माझा प्रयत्न असतो असेही काहींचे नाव घेता टोला अजित पवार यांनी लगावला.

मुंबईत २४ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस वाढली नाही त्याच्या कितीतरी पटीने समीरभाऊच्या नेतृत्वाखाली वाढेल त्यासाठी सरकारची ताकद उभी करु. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला.

मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते – प्रफुल पटेल

तमच्यासोबत आम्ही आहोतच. मात्र मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते असा विश्वास राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

या षण्मुखानंद सभागृहाचे आणि पक्षाचे एक वेगळे नाते आहे. इथल्या बैठकीत अजितदादा पवार यांनी एल्गार पुकारला होता. त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद अजितदादा पवार यांना राज्यातून मिळाला होता. राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे हे सिध्द झाले आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले.

१९९१ मध्ये अजितदादा आणि मी एकत्र लोकसभेत होतो हे सांगतानाच अजितदादा पवार यांनी पक्षाची ताकद वाढवण्याचे काम केले हे स्पष्टपणेच प्रफुल पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईकडे लक्ष कमी राहिले आहे. वारंवार कॉंग्रेसच्या सोबत राहिलो त्यामुळे कमी जागा लढवायचो. पसंतीच्या जागा कधीच मिळत नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांनी ग्रामीण भागात वाढवली आहे. आता शहराकडे अजितदादा पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी शहराकडे लक्ष घातले असल्याने त्यादृष्टीने काम करायचे आहे. समीरभाऊ यांनी काम सुरू केले आहे त्यामुळे आज आज खरी लोकं सभागृहात दिसत आहेत असेही प्रफुल पटेल म्हणाले.

येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे – सुनिल तटकरे

समीरभाऊ ज्यापध्दतीने तुम्ही या मुंबई शहरात काम करत आहात ते लक्षात घेता आता जेवढे नगरसेवक आहेत त्यापेक्षा तिप्पट नगरसेवक पुढच्या निवडणुकीत असतील अशी ताकद उभी राहिली असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

धर्मनिरपेक्ष विचारापासून फारकत न घेता राज्याच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला. राजकीय विचारधारा घेऊन गतीमान भूमिका घेऊन काम करत आहोत.सरकारच्या माध्यमातून जनकल्याण योजना राबवल्या जात आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाची सोडवणूक केली आहे. अल्पसंख्याक समाजाच्याहिताची सोडवणूक दादा तुम्ही निधी देऊन केली आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

महिलांचे चौथे धोरण सरकारने जाहीर केले आहे. नवी पहाट, नवी सकाळ महिलांच्या आयुष्य आत पहायला मिळणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची पदे घेण्यासाठी स्पर्धा होते याचा अर्थ पक्षाची ताकद वाढत आहे हेही समीर भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिले.

जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी जो पक्षाचा स्ट्राईक रेट होता त्यापेक्षा अधिक स्ट्राईक रेट अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा तयार होईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतल्याने जबाबदारी वाढली आहे; उडान तय करेगी आसमान किसका है – छगन भुजबळ

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. न्यायालयात आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त करतानाच एक तरी खासदार आपल्याला मिळाला पाहिजे ती जबाबदारी आपण घेतली आहे ती घेऊन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

रात नही ख्वाब बदलता है, मंजिल तो वही रहती सिर्फ कारवा बदलता है… किस्मत बदले या ना बदले वक्त जरुर बदलता है… अशी शायरीतून छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना साद घातली.एकमेकांचे पाय खेचू नका. खेकडयासारखे वागू नका एकमेकांना साथ द्या. एकजूट होऊन काम केले तर यश निश्चित तुमचे आहे. शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा आम्ही बदलली नाही. अजितदादा पवार आणि आम्ही सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

भविष्यात नगरसेवक, आमदार निवडून आणायचे आहेत. घरी बसला आणि मोबाईलवर मेसेज पाठवून उपयोग नाही. ‘लोकांना लढणारी माणसे आवडतात रडणारी नाही’ तुम्ही लढा द्याल तेव्हा लोक तुमच्या सोबत येतील असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी बोललो आणि सगळे नेते तेच बोलत आहेत फक्त मी जास्तीचे आणि समाजाला समजेल असे बोलत आहे. तुम्ही ओबीसींमधील आरक्षण कशाला मागताय. तुम्हाला दिले होते ना… ते टिकले नाही मात्र त्यावेळी असलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. राजकारण कोण करत असेल तर पंचायत होईल असे समजवताना गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मी आज लढतोय का?… मंडल आयोगासाठी लढलो ना…पवारसाहेबांसोबत लढलो. कुणाच्या हक्कावर गदा येणार नाही असे काम आपल्याला करायचे आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. कुणाच्या दादागिरीकडे लक्ष देऊ नका… उडान तय करेगी आसमान किसका है…अशा शब्दात पक्षाचा इरादा छगन भुजबळ यांनी स्पष्ट केला.

मुंबईत लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व दाखवेल – समीर भुजबळ

हे वर्ष निवडणुकीचे असून मुंबईत पक्षाची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीला एक लोकसभा दिली तर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच मुंबईतील १५ विधानसभा मतदारसंघात आमदार आणि महानगरपालिकेत ७५ जागा निवडून आणू असा शब्दही मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी पक्षाला दिला.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन आम्ही पक्षाच्या नेत्यांना दिलेला शब्द पंधरा दिवसात पूर्ण केला आहे असेही समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले.

पक्षाने कमिट्या, महामंडळावर कार्यकर्त्यांना संधी दिली तर अजून पक्षवाढीला चालना मिळेल असेही समीर भुजबळ यावेळी म्हणाले.

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, मनिषा तुपे, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, शिवाजीराव नलावडे यांनी आपले विचार मांडले.

युवक अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या युथ विंग वेबसाईटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

दुपारी कल्याण येथे भव्य कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य संवाद मेळावा पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक अध्यक्ष सुनिल गिरी यांनी केले तर सुत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, शिवाजीराव नलावडे, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, मनिषा तुपे, युवक अध्यक्ष सुनिल गिरी, आदींसह पक्षाचे सहा जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ