म्हापश्यात कमळचं फुलणार; युवा नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी व्यक्त केला विश्वास

म्हापसा – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सध्या गोव्यात सुरु असून सर्वच पक्ष आता कंबर कसून मैदानात उतरले आहेत. यातच म्हापसा मतदार संघातील लढत देखील रंगतदार बनली असून बहुरंगी लढतीमुळे सर्वांचेच लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता म्हपश्यातील नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी भाजप उमेदवार जोशुआ डिसुझा यांच्या विजयाचा दावा केला आहे.

राउळ म्हणाले,  नव्याने मतदार झालेल्या युवकांकडे मतदानासाठी जाताना विशेष पर्याय असत नाही कारण त्यांना भाजपशिवाय कोणताही पर्याय योग्य वाटत नाही. कारण युवकांना चांगले माहिती आहे कि युवकांच्या भविष्यासाठी झटणारा एकच पक्ष आहे तो पक्ष म्हणजे भाजप होय. यामुळेच भाजपने एक तरुण उमेदवार म्हापसा मतदारसंघासाठी दिला आहे. मी स्वतःचे देखील उदाहरण देवू शकतो. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला भाजपने नगरसेवक बनवले.

आज भाजपने युवकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आर्थिक विकास महामंडळ हे तरुणांना उद्योगासाठी केवळ चार टक्के व्याजाने कर्ज पुरवत आहे. तसेच तरुणांसाठी स्वयंरोजगार योजना राबविली आहे. माझे तरुणांना आवाहन आहे कि या योजनांचा लाभ घ्यावा.
कोरोनाच्या काळात सुद्धा विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला. गेल्या अडीच वर्षात त्याने अनेक योजना राबविल्या.  कुचेनी येथील कचऱ्यातून विद्युतनिर्मिती प्रकल्प,तार येथील नवा जोडरस्ता,सारस्वत हायस्कूलचा होऊ घातलेला क्रीडा प्रकल्प, भूमिगत विद्युतीकरण असे अनेक प्रकल्प होऊ घातले आहेत. हा विकासाचा वेग असाच अविरत राहायला हवा असेल तर पुन्हा एकदा जोशुआ डिसुझा यांना निवडून देणे आवश्यक आहे. सध्या  वार्ड नंबर १४ मध्ये जोरदार प्रचार सुरु असून जोशुआ हेच निवडून येतील असा मला विश्वास वाटतो असं राऊळ  यांनी म्हटले आहे.