गौतम अदानी आणि पवार कुटुंबांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत – सुप्रिया सुळे 

बारामती – जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक (One of the richest people in the world) असलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांनी बारामतीचा (Baramati) पाहुणचार घेतला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह पवार कुटुंबाच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांना अदानींनी हजेरी लावली. यावेळी आमदार रोहित पवार(Rohit Pawar)  यांनी स्वतः गाडी चालवत अदानींच सारथ्य केलं.

गौतम अदानी आणि पवार कुटुंबांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत. अदानी दरवर्षी दिवाळीला बारामतीत येतात. आज तिथीनुसार दिवाळी नसली तरी सायन्स सेंटरचं (Science Center) उद्घाटन हा दिवाळीचा योग आहे आणि अशावेळेस गौतम अदानी उपस्थित आहेत असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

एकीकडे केंद्रातील भाजपा सरकार (BJP Gov) उद्योजक अदानी यांना उद्योग क्षेत्रात झुकते माप देत असल्याची नेहमी चर्चा होते. या पार्श्वभुमीवर देशातील बडे उद्योजक गौतम अदानी यांची बारामती भेट औत्सुक्याचा विषय होती.  या कार्यक्रमात अदानी यांना आयोजकांनी भाषणासाठी नाव पुकारत विनंती केली. मात्र, भाषण करणे त्यांनी टाळले.