रिक्षाचालकाने पाचव्या मजलावरून उडी मारत जीवन संपवलं; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

पुणे : रिक्षाचालकाने (Rikshaw driver) मालकाच्या त्रासाला (Pune Crime news) कंटाळून आत्महत्या (suicide) केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांने एक व्हिडीओ शुट करुन Whatsapp ग्रुपवर शेअरदेखील केला होता. या रिक्षाचालकाने राहत्या घराच्या पाचव्या मजलावरून उडी मारत जीवन संपवलं आहे. पुण्यातील कोंढवा भागातून ही घटना समोर आली आहे. तोहिद शेख असे या तरुण रिक्षाचलकाचं नाव होतं.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तोहिद शेख (Tohid Sheikh) हा एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत होता. अरबाज वली मोहम्मद मेमन असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. शेख हा चार वर्षांपासून त्यांच्याकडे काम करत होता. काल मेमन आणि शेख याचा वाद झाला होता. त्यानंतर मेनन यांनी शेख याला सासऱ्यांसमोर शिवीगाळ केली. याचा राग आल्याने शेख याने व्हिडीओ तयार करुन 6 व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

आज सकाळी साडे आठच्या दरम्यान त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा आणि आपबिती सांगणारा व्हिडिओ बघतोय रिक्षावाला कोंढवा गृपवर टाकला आणि बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर या ग्रुपवरील लोकांनी त्वरित त्याला कॉल करायला सुरवात केली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी