The Vaccine War : ‘तुम्ही चित्रपट न पाहताच कसं म्हणता प्रोपगंडा? हिंमत असेल तर….’ पल्लवी जोशींचे नेटकऱ्यांना आव्हान

The Vaccine War: अभिनेत्री आणि लेखिका पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या सध्या त्यांच्या आगामी सिनेमा द व्हॅक्सिन वॉर मुळे चर्चेत आहेत. २८ सप्टेंबर रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक, अनुपम खेर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. सोशल मीडियावर द व्हॅक्सिन वॉर हा एक प्रोपगंडा मुव्ही असल्याच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. त्यावर निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी परखडपणे ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पल्लवी जोशी म्हणाल्या की, मला ट्रोल करणाऱ्यांविषयी काहीही बोलायचे नाही. त्याचे कारण ती लोकं चित्रपट पाहत नाहीत. आणि ती लोकं माझ्या चित्रपटाचा प्रेक्षकवर्गही नाहीत. त्यामुळे मी काय सांगते, म्हणते ते त्यांच्यापर्यत पोहचत नाही. त्यांना त्या कलाकृतीतील भावनाही समजत नाही.
यावेळी पल्लवी जोशी यांनी द ताश्कंद फाईल्स नावाच्या त्यांच्या चित्रपटाची आठवण करुन दिली. त्या म्हणाल्या, त्या चित्रपटाला देखील प्रोपगंडा असे म्हटले गेले होते. लाल बहादुर शास्त्री हे तर कॉग्रेसचे नेते होते. तर मग ती प्रोपगंडा फिल्म कशी असू शकते, मला तर काहीच समजत नाही. असा हा सगळा प्रकार आहे. असे मत जोशी यांनी यावेळी व्यक्त केले होते.
मला त्या लोकांना सांगायचे आहे की, व्हॅक्सीन वॉरला ट्रोल करणाऱ्यांनी तो चित्रपट एकदा पाहावा आणि त्यानंतर ठरवावे. मला माहिती आहे की, ट्रोल करणाऱे तो चित्रपट पाहणार नाहीत. कारण त्यांनी तो चित्रपट पाहिला तर ते बदलून जातील. त्यांचे विचार बदलतील. असेही पल्लवी जोशी यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण