कीर्तनकारासोबतचा व्हिडीओ व्हायरल; बदनामी होत असल्याने महिलेने केले विषप्राशन

औरंगाबाद : राज्यभरात एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा ‘नको तसला’ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात.

व्हिडिओतील किर्तनकार महाराज हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर (Youtube) मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र, त्यांचे नको त्या अवस्थेतील दोन व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे .

दरम्यान, सदरचा (Aurangabad Viral Video) व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत असल्याचं लक्षात येताच सदरील महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सदरील महिला वर औरंगाबाद (Aurangabad)  येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.