हिरकणीचा वारसा पुढे करत तिने 18 महिन्यांच्या लेकीसोबत सर केलं कळसूबाई

महाराष्ट्र ही वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. यांचा प्रत्यय आजची पिढी वारंवार आपल्या कृतीतून दाखवून देत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चलविणारे अनेक मावळे आणि हिरकणी आजही या मातीत आहेत. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा आपला इतिहास आहे हे आज पुन्हा महाराष्ट्राच्या लेकीनी सिद्ध केले आहे.

सोलापूरच्या श्रुती गांधीने आपल्या 18 महिन्यांच्या लेकीला स्वतासोबत घेऊन राज्यातील सर्वोच्च शिखर सर केले आहे. फक्त 18 महिन्यांच्या उर्वी प्रीतेश गांधी या सोलापुरच्या चिमूरडीने आपल्या आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील कळसूबाई शिखर सर केले आहे.

सोलापुरातील गांधी कुटुंबीय हे शिवविचारांवर श्रद्धा ठेवून गडकिल्यांची भ्रमंती करत आहे. मागच्या वर्षी पासून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.या सर्व मोहिमेतील एक भाग म्हणून त्यांनी आज कळसूबाई शिखर सर केले आहे. त्यांनी पहाटे साडे चार वाजता चढाई करण्यास सुरुवात केली होती.सकाळी 8 वाजण्याचा सुमारास त्या मायलेकींनी शिखर सर केले.