शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा

Jalgaon – आम्ही बंडखोरांच्या परतीचे दोर कापले नसल्याचे सांगत शिवसेना (Shivsena Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटात काही आमदार नाराज असून काहीजण संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी म्हटले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नसल्याचे म्हटले. बंडखोरांना माघारी परता येईल असे संकेत देताना त्यांनी परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नसल्याचे म्हटले. आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत आहे. ते आमच्या संपर्कात असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले.