INDvsPAK सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी, बीसीसीआय आणि जय शहावर चिडले लोक; कारण काय?

Argument Heated Over INDvsPAK World Cup Match: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना दोन्ही देशांच्या क्रिकेटचाहत्यांसाठी युद्धापेक्षा कमी नसतो. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा हाय व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, भारतातील काही लोकांनी सोशल मीडियावर सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर ‘#BoycottIndoPakMatch’, ‘#ShameOnBCCI’, हे हॅशटॅग्ज ट्रेंडिंगला आहेत. अनेक भारतीय चाहते भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत आणि देशातील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरत आहेत.

पाकिस्तान संघाच्या भारतात भव्य स्वागताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीमेपलीकडील खेळाडूंना एवढी प्रेमळ आणि सौजन्याने वागणूक का दिली जात आहे? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले, कारण दोन्ही देशांमधील तेढ अजूनही सुरूच आहे आणि सीमेवर अनेकदा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून भारतीय सुरक्षा अधिकारी मारले गेले आहेत.

 

13 सप्टेंबर रोजी अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि पोलीस उपअधीक्षक शहीद झाले होते. या प्रसंगाची आठवण करुन देत ट्वीटरद्वारे अनेकांनी बीसीसीआय आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर टीका केली आहे.

शिवाय, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआयने कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमात शंकर महादेवन, सुखविंदर सिंग आणि अरिजित सिंग सारखे बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार आहेत. विशेषत: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला नव्हता. आणि आता भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कार्यक्रम नियोजित केला गेला असल्यामुळे बरेच चाहते नाराज झाले आहेत. या वादग्रस्त घोषणेमुळे आधीच गुंतागुंतीची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

2013 पासून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेटचे सामने ICC आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) स्पर्धांपुरते मर्यादित आहेत. भारताचा शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 मध्ये आशिया कपसाठी होता.

महत्वाच्या बातम्या-

महिलांनो रस्त्यावर उतरा,सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका ; शरद पवारांचा सल्ला

उबाठा गटाने दादाजी भुसे यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘अंधारा’त तीर मारण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रे

महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा