पुन्हा सत्तेत येणार, महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देणार; उद्धव ठाकरेंच्या विधानाची चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आपण पुन्हा एकदा सत्तेत येऊ, राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळवून देऊ, असे लक्षवेधी विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. वांद्रे येथे लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

“महाराष्ट्राची ताकद एकवटत आहे. मला आनंद आहे. मी बोलू शकतो. रस्त्यावर उतरलो तर काहीही करू शकतो. ही ताकद म्हणजे शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती आहे. शिवशक्ती, भीमशक्ती, लहुशक्ती एकत्र येणार आहे. या तिन्ही शक्तींचा मिळून महाराष्ट्रात आपण मोठी ताकद निर्माण करू शकतो. आपल्या महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी (Women Chief Minister) बसवायची आहे”, असे यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले.

यानंतर त्या महिला मुख्यमंत्री कोण असतील?, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.