खुल्लम खुल्ला प्यार करेंगे :  हृतिक रोशनचे ‘या’ हॉट अभिनेत्रीसोबत जोडले जातेय नाव 

मुंबई – हृतिक रोशन गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे नाव गायिका आणि अभिनेत्री सबा आझादसोबत जोडले जात आहे. पहिली पत्नी सुजैन खानपासून विभक्त झाल्यानंतर हृतिक आता सबाला डेट करत असल्याचाही चाहत्यांचा अंदाज आहे. आता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचून हृतिकने सबासोबतचे नाते जवळजवळ स्पष्ट  केले आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत प्रवेश करताना दिसत आहेत. यादरम्यान हृतिक काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, सबा आझाद काळ्या रंगाच्या कट आउट ड्रेसमध्ये दिसली, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती. तिने गोल्डन हिल्स घातलेली आणि हातात क्लच घेतलेली दिसली.

इतकंच नाही तर पार्टीत उपस्थित हृतिक रोशन, अयान मुखर्जी आणि इतर मंडळी सबा आझादची ओळख करून देताना दिसत आहेत. याशिवाय सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हृतिक आणि सबा पापाराझींसमोर पोज देऊन बरेच फोटो क्लिक करताना दिसत आहेत. फोटोशूट दरम्यान दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसायला लागतात.

हृतिक रोशनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोणसोबत त्याची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘विक्रम वेध’ हा चित्रपट आहे, ज्यामध्ये तो सैफ अली खानसोबत काम करत आहे.