राज ठाकरे जे बाेलले ते सत्यच; देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंची पाठराखण

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला धुतल्यानंतर आता महाविकास आघाडी मनसेवर तुटून पडले आहे. अशा वेळी राज्यातील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे (raj thackeray) यांचे शिवसेनेबाबतचे (shivsena) वक्तव्य १०० टक्के याेग्य आहे. (devendra fadnavis latest marathi news) राज्यातील बहुमताचा अनादर करीत शिवसेनेने काॅंग्रेस (congress), राष्ट्रवादीशी (ncp) आघाडी करत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसत कपटाने सत्ता मिळवली हेच राज ठाकरेंनी काल सांगितले. असं ते म्हणाले.

फडणवीस आज नांदेड दाै-यावर आले आहेत. त्यावेळी माध्यमांनी त्यांना राज ठाकरे यांनी शिवसेना राज्यातला तीन नंबरचा पक्ष आहे असे म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे असे विचारताच फडणवीस म्हणाले राज ठाकरे जे बाेलले ते सत्यच आहे. भारतीय जनता पक्ष (bjp) सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. भाजपने सेनेसाेबत युती केली हाेती. शिवसेनेच्या देखील चांगल्या जागा निवडून आल्या हाेत्या. असं ते म्हणाले.