Who is Radhika Merchant: मुकेश अंबानींची होणारी सून राधिका कोण आहे?

Radhika Merchant : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश (Mukesh Ambani) अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत (Anant Ambani) याचा आज साखरपुडा झाला आहे. अनंतचा साखरपुडा त्याची बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) झाला आहे. रिलायन्स ग्रुपचे संचालक-कॉर्पोरेट अफेयर्स परिमल नाथवानी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आता अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंट कोण आहे हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. जाणून घेऊया राधिकाबद्दल…

राधिका मर्चंट एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका आणि अनंत खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत. 28 वर्षांची राधिका एक ट्रेंड डान्सर आहे. तिने श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम शिकले आहे. राधिका कुटुंब गुजरातमधील कच्छ येथील आहे. राधिकाच्या धाकट्या बहिणीचे नाव अंजली मर्चंट आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडिएल वर्ल्ड स्कूलमधून केले. राधिका न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवीधर आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर, 2017 मध्ये, राधिका रिअल इस्टेट फर्म Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून सामील झाली. राधिकाला पुस्तके वाचण्याची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे. यासोबतच राधिका प्राण्यांच्या कल्याणासाठीही काम करते. 2018 मध्ये राधिकाचा अनंत अंबानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे.

राधिका अनेक वर्षांपासून अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये दिसली आहे. 2018 मध्ये ईशा आणि आकाश अंबानीच्या एंगेजमेंटमध्येही राधिका खूप सक्रिय होती. नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासोबतही राधिकाचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे म्हटले जाते. राधिकाच्या सोशल मीडिया पेजवरही नीता आणि मुकेश अंबानीसोबत राधिकाचे अनेक फोटो आहेत. 2019 मध्ये दोघांच्या एंगेजमेंटची बातमी समोर आली होती. मात्र, नंतर रिलायन्स समूहाने ही अफवा असल्याचे म्हटले होते.

राधिका मर्चंटचे कुटुंब आणि अंबानी कुटुंबाने या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रम सोहळ्याचे आयोजन केले होते . यात अभिनेते, आमिर खान, सलमान खान, रणवीर सिंग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे दोन पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय आणि बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. काही वेळापूर्वी, अंबानीच्या एका फॅन पेजने एक जुना फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये नीता अंबानी त्यांचे पती मुकेश अंबानी, सून श्लोका मेहता आणि सून होणारी राधिका मर्चंटसोबत दिसली होती. ते एका मंदिरात गेले होते. राधिका आणि श्लोका या दोघीही लाल रंगाच्या कपड्यात दिसल्या होत्या.