आघाडीतून राष्ट्रवादी बाहेर पडणार का? जयंत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका 

मुंबई : महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदेंच्या बंडात सामिल होत असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भावणीक आवाहनाचा फारसा परीणाम झालेला दिसत नाही. यातच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा आम्ही फ्लोअर टेस्टला (floor test) सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत अजुनही अनेक आमदार वापस येतील आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असा आशावाद व्यक्त केला आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेसने (NCP)  आम्ही शिवसेना (Shivsena) आणि उध्दव ठाकरे यांच्या पुर्ण पाठीशी असल्याचे सांगितल्यामुळे घडामोडी कोणते वळण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी राष्ट्र्वादीची भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, महाविकास आघाडी सरकार टीकावं, अशी आमची इच्छा आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवश्यक ती मदत करणार असल्याचं जयंत पाटील माध्यमांना बोलताना म्हणाले. दरम्यान, जे आमदार शिवसेनेतून गेले आहेत. ते आमदार आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असंही पाटील यावेळी म्हणालेत. सरकार टिकावं अशी आमची भूमिका आहे. तर शिवसेनेत अंतर्गत काय चाललंय हे माहीत नाही. सरकार टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही पाटील म्हणालेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांची भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, विरोधी बाकावर बसण्याची तयारी करावी लागत नाही. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आमच्या सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांना कोणताही हव्यास नाही. आमची सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकार स्थापन झालं होतं. अडीच वर्षाच्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती. राज्य सरकारनं आणि आम्ही चांगले निर्णय घेतले आहेत, असंही पाटील यावेळी म्हणालेत.