आमदार राहुल कुल यांच्या मदतीमुळे वैभवच्या पायात आले बळ

दौंड – दौंड चे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांच्या मदतीमुळे भांडगाव येथील वैभव शेळके (Vaibhav Shelke) या तेरा वर्षीय मुलाची शस्त्रक्रिया पार पडली. जन्मतः अस्थिव्यंगामुळे स्वतःच पायावर चालत येत नसलेला वैभव या शस्त्रक्रियेनंतर स्वतःच्या पायावर उभा राहिला. वैभव यास त्याच्या पायावर उभा पाहताना त्याच्या कुटुंबियांचा आनंद अवर्णनीय होता.

भांडगाव ता. दौंड येथील सीताराम शेळके यांचे चिरंजीव वैभव वय वर्षे १३ याला जन्मजात असलेल्या अस्थिव्यंगामुळे स्वतःच पायावर चालत येत नव्हते. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या या शेतमजूर कुटुंबाला पैशाअभावी त्याचे उपचार करणे शक्य होत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दौंडचे आमदार अ़ॅड. राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला व मदतीची विनंती केली. आमदार अ़ॅड. राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये वैभवची ४ लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत करण्यात आली.

उपचारानंतर वैभव पहिल्यांदा त्याचा पायावर उभा राहिला आहे. नुकतीच वैभवाची भेट घेऊन त्याचा तब्बेतीची विचारपूस कांचन कुल यांनी केली. वैभवच्या  कुटूंबियांनी आमदार राहुल कुल आणि कुल कुटुंबियांचे आभार मानले.