धनंजय मुंडे यांना धमकी देणारी महिला ताब्यात, पाहा कोण आहे ती महिला ?

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंडे यांना एका महिलेनं बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला धनंजय मुंडे यांच्या परिचयाची आहे. याबाबत मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सदर महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून 5 कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली होती. हे न दिल्यास समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली होती. धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईल फोनही कुरिअर द्वारे पाठवला होता. मात्र यानंतरही संबंधित महिला आणखी पाच कोटी रुपयांच्या ऐवजाची मागणी करत होती. मग मात्र धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.

दरम्यान,  खंडणी मागितल्या प्रकरणात रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर रेणू शर्मा यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी म्हणजेच 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी (Renu Sharma sent to 3 days police custody) सुनावली आहे.

या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी म्हटलं, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा त्रास होतोय. त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरुद्ध केली. ती तक्रार परत मागे घेतली. काही दिवसांपासून जो त्रास होता तो मी सहन करत होतो. शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. या पुढे जे काही करतील ते पोलीस करतील असं म्हणून धनंजय मुंडे यांनी पाच कोटीचा खंडणी प्रकरणी तक्रार दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली.